आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर! संदीप नागरे
महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर!

हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद दौऱ्यादरम्यान, आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद दौऱ्यादरम्यान, आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेदरम्यान दोन्ही वेळा गोंधळ होत असल्याची स्थिती पुढे आली आहे, यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला विनंती करत विद्यार्थ्यांची हेळसांड थांबवावी अशी मागणी केली आहे.

हे देखील पहा :

आरोग्य विभागाने मागच्या वेळी परीक्षा पुढे ढकलली आहे, त्या बरोबर एका व्यक्तीला एकच फी असावी त्याने दोन किंवा तीन पेपर दिले तरी फीस एकच ठेवण्याची मागणी ही त्यांनी केली. तसेच अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठी नंबर वेगवेगळ्या जिल्ह्यात आला असेल तर त्या संबंधी परीक्षेच्या आधी तातडीने करेक्शन करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी राज्यसरकारला केले आहे.

आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करण्याच्या भाजपच्या मागणीवर आमदार रोहित पवार यांचे भाष्य :

आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान वारंवार गोंधळ पुढे येत असल्याने भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र देत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं असून अतुल भातखळकर यांनी, शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊन राज्य सरकारचे केंद्र सरकारने थकवलेले 35 हजार कोटी रुपये देण्यासाठी देखील लेखी मागणी करावी असे सांगत अतुल भातखळकर यांच्यावर टीका केली आहे. आमदार रोहित पवार हे आज हिंगोली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संवाद दौऱ्यानिमित्त हिंगोलीत आले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manali Winter Tourism: हिवाळ्यात मनाली ट्रिप प्लान करताय? 'ही' आहेत 8 Hidden लोकेशन्स

Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा

शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

Pear Benefits: थंडीत पेर खाल्ल्याने शरिराला होताता 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला, आमदार कांदेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

SCROLL FOR NEXT