Hingoli Saam
महाराष्ट्र

Hingoli: भरधाव डंपर बाजारपेठेत शिरला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडकला, दोघांचा मृत्यू; हिंगोलीत अपघाताचा थरार

Hingoli Accident: हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात आज मदिना चौक परिसरात एक भीषण अपघात घडला. वीटभट्टीसाठी माती वाहून नेणारा डंपर भरबाजारात घुसला, तसेच नागरिकांना चिरडले.

Bhagyashree Kamble

हिंगोलीत आज एक भीषण अपघात झाला आहे. वीटभट्टीसाठी माती वाहून नेणाऱ्या डंपरने भरबाजारात घुसून नागरिकांना चिरडले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा भीषण अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोलीतील वसमत शहरातील मदिना चौक परिसरात ही घटना घडली. कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकून थेट एका दुकानात शिरला. या भीषण अपघातात पाच ते सहा जण चिरडले असल्याची माहिती समोर आली असून, दोन ते तीन नागरिकांसह चिमुकले डंपरच्या खाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर याची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली. वसमत शहरात दिवसा जड वाहतुकीला प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली असताना, वीट भट्टीच्या कामासाठी दिवसा देखील मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक सुरू आहे, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

दरम्यान घटनास्थळी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले असून अपघात स्थळावरून जखमींना वसमत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT