Hingoli Vaishnavi Vitthal Jayabhai MBBS Degree SaamTV
महाराष्ट्र

माझी मुलगी डॉक्टर झाली! बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेक परदेशात, हातात MBBSची डिग्री घेऊन परतली; कुटुंबाची छाती गर्वाने फुलली

Hingoli News : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फिलिपिन्स देशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या कुमारी वैष्णवी विठ्ठल जायभाय हिचा जन्म १४ एप्रिल २००० मध्ये झाला.

Prashant Patil

हिंगोली : हिंगोलीमध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीनं फिलिपिन्स देशात जात पाच वर्षाचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. डॉ. वैष्णवी विठ्ठल जायभाय असं या विद्यार्थिनीचं नाव असून, ही विद्यार्थिनी हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या गोजेगावची रहिवासी आहे. विशेष म्हणजे गोजेगावमधील पहिली एमबीबीएस डॉक्टर म्हणून पुण्याचा बहुमान देखील या विद्यार्थिनीने मिळवला आहे. वैष्णवीच्या या यशामुळे हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत समाजातील विद्यार्थ्यांनी वैष्णवी जायभाय हिचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं आहे.

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फिलिपिन्स देशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या कुमारी वैष्णवी विठ्ठल जायभाय हिचा जन्म १४ एप्रिल २००० मध्ये झाला. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे तर माध्यमिक शिक्षण बीड जिल्ह्यातील परळी येथे झाले. पुढे महाविद्यालय शिक्षण व नीट परीक्षेसाठी वैष्णवीने लातूर जिल्हा गाठला. मात्र केवळ पाच मार्क कमी मिळाल्याने वैष्णवीला भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैष्णवीने थेट फिलिपिन्स गाठत हे यश मिळवलं आहे.

दरम्यान, आता लेक वैष्णवी पाच वर्षांनी आपलं शिक्षण पूर्ण करुन घरी परतली आहे. तिने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. लेकीनं केलेल्या या प्रगतीनं तिच्या आई वडिलांची मान गर्वाने उंचावली आहे. माझी लेक डॉक्टर झाली असं म्हणत ते गावभर मिरवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT