Hingoli News  Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News: देवाचं घर कुठंय? माझ्या बाबांना परत पाठवा; दिवाळी येतेय, शेतकऱ्याच्या मुलीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

Letter To CM : किरण नारायण खोडके, असं या पत्र लिहिणाऱ्या मुलीचं नाव आहे.

Bharat Jadhav

(संदीप नांगरे)

Farmer daughters Letter To CM Shinde:

सर,देवाचं घर कुठं आहे? त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला, पाठवा लवकर दिवाळी येणार आहे, हे शब्द आहेत एका मुलीच्या पत्रातील. हे पत्र हिंगोलीमधील एका १३ वर्षाच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल आहे.(Latest News)

किरण नारायण खोडके, असं या पत्र लिहिणाऱ्या मुलीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून किरणच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या केल्याचं गावकरी सांगतात. आत्महत्येची घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली होती. नारायण खोडके, असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले होते. परंतु त्याच्या मृत्यूमुळे निराधार झालेल्या मुलीने आपल्या वडिलांना परत आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. या मुलीचे पत्र वाचून डोळ्यात पाणी भरुन येईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने कुटुबांमध्ये शोककळा पसरली आहे. घरात कोणताच आनंद साजरा केला जात नाहीये. दसरा, दिवाळी साजरी केली जाणार नाहीये. यांना देवाला सांगून बाबांना पाठवा घरी दिवाळी येणार असल्याचं या मुलीने आपल्या पत्रात म्हटलंय. बापाचं छत्र हरवल्यानंतरच्या तिच्या भावना या मुलीने आपल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत. आत्महत्या का केली, याचेही कारण या मुलीने आपल्या पत्रात लिहिलंय.

बाबा देवा घरी का गेले, असं आईला विचारल्यानतंर आई फक्त रडते. शेतमालाला चांगला भाव राहिला असता तर तुझा बाबा मेला नसता, असं आई मला सांगत असल्याचं मुली म्हणते. शेतात पिकवलेला सोयाबीनचं कमी उत्पन्न आलं. आई आणि बाबाचं भांडण झालं. त्यानंतर बाबा पुन्हा आला नाही. बाबा का घरी आले नाही, असं या मुलीने आपल्या आजीला विचारलं, त्यावेळी आजीने तिला बाबा देवा घरी गेल्याचं सांगितलं. यामुळे देवाला फोन करण्यासाठी तिने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय.

Letter To Cm

पत्रामध्ये मुलीने मुख्यमंत्र्यांना सर म्हणत काही भावनिक प्रश्न केले आहेत. तुमची दिवाळी गोड जाईल. परंतु आमच्या घरी दिवाळी होणार नाही. कारण आमचे वडील घरी येत नाहीत. आमच्या घरी मी माझी बहीण, दादा आहोत. आम्ही तिघे बाबांची वाट पाहतोय. परंतु ते येत नाहीत. मग आम्हाला रिसोडच्या बाजारात कोण घेऊन जाईल. दिवाळीसाठी कपडे कोण घेईल. तुमचे बाबा बाहेर गेले तर तुमच्या घरी दिवाळी होते का? असा प्रश्न या मुलीने आपल्या पत्रात केलाय.

आम्हाला लोक म्हणता सरकारमुळे तुमचे बाबा देवा घरी गेला हे खरं आहे? देवाला सांगू का बाबाला परत पाठवायला, आम्हाला दिवाळी बाजार आणणयचा आहे. तुमची दिदी रडतेय लवकर या असा बाबाला निरोप द्या असं या मुलीने आपल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान हे भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

SCROLL FOR NEXT