Hingoli Crime Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli: सरकारी कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, तरुणाने संपवलं आयुष्य; हिंगोलीत खळबळ

Hingoli Crime: हिंगोलीमध्ये अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली. सरकारी कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटेनमुळे हिंगोलीत खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • हिंगोलीमध्ये तरुणाची आत्महत्या

  • अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी सरकारी कर्मचारी टाकत होता दबाव

  • सरकारी कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला

संदीप नागरे, हिंगोली

राज्यभरात महिला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता हिंगोलीमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. हिंगोलीमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली. पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाकडून या तरुणावर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे हिंगोलीमध्ये खळबळ उडाली.

हिंगोलीच्या बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. नांदेडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाने २४ वर्षांच्या तरुणाशी जवळीक साधत मैत्री करून त्याला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यााठी तगादा लावल्याने या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या लिपिक नवनाथ सातपुते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी बाळापूर पोलिस ठाण्यात ठिय्या देत आरोपीला अटक करण्याची मागणी केली.

हिंगोलीच्या बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ वडगाव शिवारात या तरुणाने गळफास घेतला. आरोपी नवनाथ सातपुते पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १० वर्षांपासून आरोपी आणि पीडित तरुण दोघेही मित्र असल्याची माहिती पुढे आली आहे. वारंवार अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करू देण्यासाठी आरोपी या तरुणाकडे मागणी करत होता. मात्र तरुणाने सदरील प्रकार कुणाला सांगितलं नाही. या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी पथकं रवाना केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT