Hingoli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News: धक्कादायक! हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या आवारात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

छत्रपती संभाजीनगरनंतर आता हिंगोलीतही गोळीबाराची घटना घडली आहे. हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या आवारात ही गोळीबाराची घटना घडली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

Hingoli Crime News: छत्रपती संभाजीनगरनंतर आता हिंगोलीतही गोळीबाराची घटना घडली आहे. हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या आवारात ही गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दोघांकडून भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत (Hingoli) भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हिंगोलीच्या जिल्हा परिषदे पुढे पप्पू चव्हाण यांच्यावर समोरासमोर गोळीबार केला आहे.

या घटनेत पप्पू चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीला मोठी इजा झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. तसेच पोलीस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगरातही गोळीबाराची घटना

छत्रपती संभाजीनगर येथेही काल गोळीबाराची घटना घडली. काल भरदिवसा एका व्यक्तीच्या घरात दोन अज्ञातांनी घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पुंडलिक नगर परिसरामध्ये ही घटना घडली. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्याच्या घरात हा गोळीबार झाला आहे. अज्ञातांनी या गोळीबार केला आहे.या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakesh Bedi: धुरंधरमुळे आयुष्य पालटलं, 'या' अभिनेत्याला मिळणार डबल मानधन; कारण काय?

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sweaty hands: हातांना सतत घाम येतोय? दुर्लक्ष नको, वाचा तुमचं शरीर तुम्हाला काय संकेत देतंय

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, शिवप्रेमींचा महामोर्चा

Moringa Powder Benefits For Hair: लांब आणि दाट केसांसाठी शेवग्याच्या पानांचे फायदे, घरीच करा सोप्या पद्धतीने वापर

SCROLL FOR NEXT