Firing In Asola Village Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News: हिंगोलीत क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये राडा; भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एक गंभीर जखमी VIDEO

Two Persons Fight One Injured In Firing In Asola Village: हिंगोली जिह्यात गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.

Rohini Gudaghe

भरत नागरे, साम टीव्ही हिंगोली

हिंगोलीच्या आसोला गावात दोन जणांमध्ये राडा होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही धक्कादायक घटना काल १८ जुलै रोजी घडल्याचं समोर आलंय. हिंगोलीच्या असोला ते जवळा बाजार रस्त्यावर गोळीबार झाला. जखमी व्यक्तीवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

हिंगोलीत नेमकं काय घडलं?

हिंगोलीच्या हट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील आसोला गावात ही घटना (Hingoli Crime News) घडली. क्षुल्लक कारणावरून दोन जणांमध्ये राडा झाला. या राड्या दरम्यान एका तरुणाकडून दुसऱ्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिसांसह हिंगोली पोलिसांचे विशेष पथक आसोला गावात पोहोचले होते.

गाड्या आणि घर जाळलं

नेमका कोणत्या कारणाने गोळीबार झाला याची माहिती पोलीस घेत आहेत. हिंगोली पोलिसांचे विशेष पथक या घटनेची चौकशी करत आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिंगोलीच्या असोला ते जवळा बाजार रस्त्यावर काल सायंकाळी ही धक्कादायक घटना (Crime News) घडलीय. गोळीबाराच्या घटनेनंतर अज्ञातांनी रस्त्यावर गाड्या आणि घर पेटून दिल्याचं समोर आलंय.

गावात तणावपूर्ण शांतता

गोळीबाराच्या (firing) घटनेनं सध्या आसोला गाव हादरून गेलंय. ग्रामस्थांमध्ये मोठं दहशतीचं वातावरण आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय. नागरिकांनी शांतता ठेवावी, असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी (Asola Village) केलंय. शुल्लक कारणावरून वाद झाला अन् त्याचे रूपांतर गोळीबारात झाल्याचं समोर आलंय. सध्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत, तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT