Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : आलिशान कारमधून गांजाची वाहतूक; पोलिसांच्या कारवाईत ३६ किलो गांजा जप्त

HIngoli News : बाळापूर पोलिसांनी गांजा घेऊन जाणारी कार ताब्यात घेत कारमधील ३६ किलो गांजा जप्त केला आहे

संदीप नागरे

हिंगोली : बंदी असताना देखील गांजाची लागवड व वाहतूक केली जात आहे. चोरून वाहतूक करताना वेगवेगळी शक्कल वापरली जाते. असाच प्रकार (Hingoli) हिंगोलीत समोर आला आहे. महागड्या आलिशान गाडीमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याचे (Police) पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. (Tajya Batmya)

हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून तपासणी सुरु होती. याच दरम्यान महामार्गावरून जात असलेल्या आलिशान कारची पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये गांजाची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बाळापूर पोलिसांनी गांजा घेऊन जाणारी कार ताब्यात घेत कारमधील ३६ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत किती आहे, याचा अंदाज अजून समजलेला नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपी फरार 

दरम्यान कारमधील आरोपींनी पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळ काढला आहे. गाडी व गांजा जप्त करत बाळापुर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT