Hingoli crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli crime : चुकीच्या माहितीतून गैरसमज झाल्याने तलाठ्याची हत्या; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Hingoli News : परस्पर जमीन त्याच्या काकाच्या नावावर करून देत असल्याची खोटी माहिती मिळाली

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यात महसूल प्रशासनातील तलाठ्याचा पोटात व छातीत चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना २८ ऑगस्टला दुपारी घडली होती. चुकीची माहिती मिळाल्याने तलाठ्याच्या खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. 

संतोष पवार असे खून झालेल्या या तलाठ्याचे नाव असून आता या खून प्रकरणात (Police) पोलिसांनी आरोपी प्रताप कराळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून खून करणाऱ्या (Hingoli) आरोपीला तलाठी परस्पर जमीन त्याच्या काकाच्या नावावर करून देत असल्याची खोटी माहिती मिळाली होती. या माहितीची कोणतीही खात्री न करता प्रताप कराळे याने तलाठी शासकीय कामकाज करत असताना अचानक कार्यालयात येऊन डोळ्यात मिरची पूड टाकत खून केला आहे. 

विशेष म्हणजे कोणतंही शासकीय कामकाज प्रलंबित नसताना केवळ गैरसमजतीतून एका तलाठ्याचा बळी गेल्याने आता तलाठी संघटना आक्रमक झाली आहे. या विरोधात आज राज्यभर महसूल प्रशासनाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान नाहक तलाठ्याचा बळी घेणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या; अशी मागणी महसूल अधिकारी कर्मचारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT