Hingoli crime Saam Tv
महाराष्ट्र

घरी कोणी नसल्याचा गैरफायदा! नराधमाने १३ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार

कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील एका १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ

संदीप नागरे

हिंगोली: जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील एका १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याने आरोपीविरुद्ध (accused) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चिमुरडी या गावात (village) तिच्या कुटुंबासह राहत होती. २२ तारखेला तिच्या कुटुंबातील सर्व जण शेतात (Farm) गेल्याची संधी साधत आरोपी प्रवीण उत्तमराव पाईकराव याने चिमुरडीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या घरात अनाधिकृतरीत्या प्रवेश करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे देखील पाहा-

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचार केल्यानंतर पीडित चिमुरडीस ही घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारून टाकण्याची धमकी (Threat) देखील दिली होती. मात्र, आई- वडील शेतामधून घरी आल्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार कथन केल्यासनंतर तातडीने, या चिमुरडीच्या वडिलांनी आखाडाबाळापुर पोलिसात (police) फिर्याद दाखल केली आहे.

यानंतर बाळापूर पोलिसांनी तातडीने आरोपी नराधम प्रवीण उत्तम पाईकराव याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला आहे. बाळापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT