Hingoli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News: हिंगोली जिल्हा हादरला! २७ वर्षीय तरुणाची चौघांकडून निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर...

Latest Marathi News: परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्या करणाऱ्या चारपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संदीप नागरे

Basamba Crime News: हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोलीच्या बासंबा गावात चार जणांनी मिळून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्या करणाऱ्या चारपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Hingoli News)

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीच्या (Hingoli) बासंबा गावात चार जणांनी मिळून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शेख सादेक शेख रशीद असे हत्या करण्यात आलेल्या २७ वर्षीय युवकाचे नाव आहे. सादेक हा हत्या करणाऱ्या आरोपीच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचा आरोप करण्यात आला असून याच प्रकरणातून ही निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर बासंबा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या हत्या करणाऱ्या चार पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर बासंबा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. तसेच गावामध्ये हिंगोली पोलिसांनी (Police) कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (Latest Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीला आता महिन्याला 6300 रुपये? सरकार लाडक्या बहिणांचा हफ्ता वाढवणार?

प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या ! हार्बर लाईनवर रविवार ते बुधवार विशेष पॉवर ब्लॉक

Jay Pawar Wedding: जय पवारांच्या लग्नात अजित दादांचा झिंगाटवर डान्स, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीच्या इतर घरं, कार्यालय, आस्थापनांची पोलिस झडती घेण्याची शक्यता

Pune News: दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा! पोलीस निरीक्षक नाईक निखिल रणदिवे बेपत्ता; व्हाट्सअप स्टेट्सन् खळबळ

SCROLL FOR NEXT