Hingoli Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Accident News: हिंगोलीत भीषण अपघात; चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅव्हल उलटली, सातजणांची प्रकृती गंभीर

Private Bus Accident On National Highway: हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रॅव्हलचा अपघात झाला आहे. यामध्ये सातजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

संदीप नागरे, साम टीव्ही हिंगोली

हिंगोलीमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. हा अपघात हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती मिळत आहे. महामार्गावर एका भरधाव ट्रॅव्हलचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. ही ट्रॅव्हल हैदराबादकडून जाताना दुर्घटना घडली आहे.

हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहेत. ही ट्रॅव्हल (Bus Accident) राजस्थान येथून हैदराबादकडे जात असल्याचं समोर आलं आहे. या ट्र्रॅव्हलमध्ये ५५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी कामगार असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात हिंगोलीच्या वसमत फाटा येथे घडला आहे. आज सकाळी (३० मे) सात वाजता हा अपघात झाला (Private Bus Accident On National Highway) आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ५५ कामगार प्रवासी घेऊन ही ट्रॅव्हल (Hingoli Accident News) जात असताना हिंगोलीच्या वसमत फाटा येथे अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. या घटनेत सात ते आठ प्रवासी कामगार जखमी झाले आहेत तर ट्रॅव्हल्सच्या चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिकांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

दरम्यान या घटनेनंतर पोलीस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे या ट्र्रॅव्हलचा अपघात (Accident News) झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. ट्रॅव्हल कोसळून महामार्गाच्या खाली गेल्याचं दिसत आहे. अपघातामुळे इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT