hindutvavadi sanghatana morcha against balumama devsthan administration saam tv
महाराष्ट्र

Balumama Devsthan : संत बाळूमामा देवस्थानच्या संभाव्य सरकारीकरणाविरोधात कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

Hindutvavadi Sanghatana Morcha : हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून बाळूमामा देवस्थान संरक्षण मोर्चाला सुरुवात केली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

श्री संत बाळूमामा देवस्थानातील (shri saint balumama devasthan) गैरव्यवहारांच्या प्रकरणाची त्वरित सीआयडी चौकशी व्हावी तसंच मंदिर सरकारीकरण न करता ते भक्तांच्या ताब्यात द्यावे यांसह अन्य मागण्यासाठी कोल्हापुरात आज (मंगळवार) हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यावेळी माेर्चेकरांच्या घाेषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. (Maharashtra News)

हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून महाराष्ट्र मंदिर महासंघ, बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकारातून बाळूमामा देवस्थान संरक्षण मोर्चाला सुरुवात केली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या मोर्चेकरांच्या हातातील फलक हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सुनील घनवट (समन्वयक महाराष्ट्र मंदिर महासंघ) म्हणाले श्री संत बाळूमामा देवस्थानात माेठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी हाेणे आवश्यक आहे. हे मंदिर सरकारीकरण न करता ते भक्तांच्या ताब्यात द्यावे असेही घनवट यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT