Buldhana Latest Marathi News, Hindu Muslim unity news in Marathi Saam TV
महाराष्ट्र

हिंदू-मुस्लीम एकोप्याचं अनोखं दर्शन; बुलडाण्यात हिंदू बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट

Buldana News : बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा: देशभरासह महाराष्ट्रात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापलं असतानाच, बुलडाणा जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं एक अनोखं दर्शन घडलं आहे. बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे. (Buldhana Latest Marathi News)

एकीकडे राज्यात भोग्यांवरून राजकारण तापलं असताना सामाजिक सलोखा जपत केळवद गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील मशिदीला भोंगा भेट देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला. अवघ्या 5 हजार लोकसंख्या असलेल्या केळवद गावात मुस्लिमांची फक्त 3 टक्के संख्या आहे. गावात एक मशीद असून या मशिदीवर अजूनही भोंगा नव्हता, हीच बाब लक्षात घेता गावातील हिंदू बांधवांनी एकत्र येत गावातील मशिदीला भोंगा भेट दिला. यावेळी गावातील सरपंचासह असंख्य गावकऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला.

या देशात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी तसेच महागाईसारखे असंख्य मुद्दे आहेत. त्यावर प्रकाश टाकण्याऐवजी राज ठाकरे हनुमान चालीसाच्या नावाखाली बहुजनांचे माथे भडकवत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर, राज ठाकरे सुपारी घेऊन राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोपही केळवदच्या ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT