Child Welfare Schemes - Beti Hai Anmol Yojana Saam TV
महाराष्ट्र

Child Welfare Schemes: पहिली बेटी धनाची पेटी; मुलगी झाल्यावर सरकार देणार २ लाख रुपये, वाचा सविस्तर

Himachal Pradesh News: पहिली मुलगी झाल्यावर २ लाख रुपये आणि दुसऱ्या मुलीलाही जन्म दिल्यास १लाख रुपये मिळणार आहेत.

Ruchika Jadhav

Beti Hai Anmol Yojana:

हिमाचल प्रदेशमधील सरकारने मुलींसाठी एक नवी योजना आणली आहे. स्त्री भ्रूणहत्या पूर्णता रोखण्यासाठी कुटुंबात पहिली मुलगी झाल्यावर २ लाख रुपये आणि दुसऱ्या मुलीलाही जन्म दिल्यास १लाख रुपये मिळणार आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या योजनेची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

राज्यात सध्या मुलींच्या जन्मावर ३५ हजार रुपयांची तरतूद आहे. आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी नव्या योजनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याबाबत आपल्या ट्वीटर (एक्स) अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच कार्यक्रमातील फोटोही पोस्ट करण्यात आलेत.

ज्या रुग्णालयात गर्भलिंग तपासणी आणि निदान केले जाते त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण थांबता थांबत नाहीये. नागरिकांमध्ये याबाबत जागृकता निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यक्ती स्त्री भ्रूणहत्या करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यात तसेच देश पातळीवर स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना तसेच प्रबोधन केले जाते. विविहीत जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. मात्र खेड्यापाड्यांत मुलाच्या हव्यासापोटी अनेक मुलींचा या जगात येण्याआधीच मृत्यू होतो. विविध उपाययोजनांच्या आधारे या घटनांना आळा घालणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर दिला विजेचा शॉक; बायकोने नवऱ्याला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: बाळासाहेब ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपला - गिरीश महाजन

Sukanya Samruddhi Yojana : आता बँकेत जायची गरज नाही, घरबसल्या उघडा सुकन्या समृद्धी योजनेचं खातं

Weekly Horoscope: 'या' राशींच्या आर्थिक समस्या सुटणार आहेत; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे भिकेचा कटोरा घेऊन गेले रामदास कदमांची जहरी टीका |VIDEO

SCROLL FOR NEXT