नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती, नो हेल्मेट नो पेट्रोल Saam Tv
महाराष्ट्र

नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती, नो हेल्मेट नो पेट्रोल

१५ ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती लागू होणार

अभिजीत सोनावणे

नाशिक -  नाशिकमध्ये Nashik पुन्हा १५ ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती Helmet लागू होणार आहे. मात्र यंदा नाशिकमध्ये या हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी जरा वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. कारण आता दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केलेलं नसल्यास त्याला शहरातील कुठल्याही पेट्रोलपंपावर पेट्रोल Petrol मिळणार नाही. हेल्मेट अभावी रस्ते अपघातात अनेक दुचाकी चालकांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत त्या पार्श्ववभूमीवर ही नाशकात १५ ऑगस्ट August पासून पुन्हा हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

हेल्मेटसक्ती लागू करूनही दुचाकी चालवताना अनेक नागरिक हेल्मेटचा वापर करतांना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा हेल्मेट वापरण्याकडे कल वाढावा, यासाठी शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल चा नियम लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे.

त्यामुळे 15 ऑगस्टपासून दुचाकीचालकांनी हेल्मेट घातलेलं नसल्यास त्यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही. यासंदर्भात पेट्रोलपंप चालकांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी या मुद्यावर मत मतांतरं पाहायला मिळत आहेत. नागरिकांमध्येही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात नाशकात हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Neck Blouse Design: बॅकलेस ब्लाऊजच्या या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन, लूक दिसेल एकदम भारी

Municipal Elections Voting Live updates : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

मतदान केंद्राबाहेर आमचा भगवा स्कॉड; बेकायदेशीर काही दिसले की जागेवर फोडणार; संजय राऊतांचा इशारा

Brain Tumor: अचानक ताप येण्यासोबत ही ४ लक्षणं दिसली तर असू शकतो ब्रेन ट्यूमरचा धोका; कसे ओळखाल संकेत?

SCROLL FOR NEXT