हेलिकॉप्टरने नवरदेवाची एंट्री
हेलिकॉप्टरने नवरदेवाची एंट्री 
महाराष्ट्र

हेलिकॉप्टरने वस्तीवर आलं राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाचं वऱ्हाड

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सोनई (अहमदनगर): लग्न जमवायला पूर्वी बैलगाडीतून प्रवास केला जायचा. नंतर मोटारी आल्या. आता त्यापलिकडे जाऊन विविध वाहनांचा वापर केला जात आहे. सिनेमात हिरो-हिरोइनसाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर आता शेतकऱ्यांच्या वस्तीवर, बांधावर उतरू लागले आहे. तोही आपल्या मुला-मुलींच्या लग्नात ही महागडी हौस भागवताना दिसत आहे. सध्या लॉकडाउनमुळे लग्न समारंभास उपस्थितीची मर्यादा आहे. परंतु यातही हौस केली जात आहे. नगर जिल्ह्यात असाच एक ग्रँड साखरपुडा झाला.

वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथील वधू राहत असलेल्या घरासमोरील अंगणात नवरदेवाचे हॅलिकॉप्टर उतरले. हवेली (जि.पुणे) येथील हा वरराजा होता. विशेष म्हणजे या वरराजासोबत होते खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि वरपिता. त्यामुळे वराची ही हॅलिकॉप्टर राईड चांगलीच चर्चेची ठरली. (Helicopter entry for the wedding of the NCP leader's son)

वडाळा बहिरोबा येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या प्रणोती व हवेली (जि.पुणे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या विवाहनिश्चितीचा (साखरपुडा) असा हटके कार्यक्रम झाला. वर खासदार कोल्हेसह हेलिकॉप्टरने आला असला तरी कार्यक्रम मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत व कोरोना नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने करण्यात आला.

पुण्याची राजकीय पाहुणे मंडळी

सांगवी रस्त्यावर असलेल्या मोटे वस्तीवर हा अगळा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास शिरुर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रबोधनकार निवृती महाराज इंदुरीकर उपस्थित होते.

मोजकेच पाहुणे

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून मोटे परीवाराने फक्त नातेवाईकांनाच आमंत्रित केले होते. वधू-वराने मित्र, मैत्रिणींना कार्यक्रमास निमंत्रित केले नव्हते. कौटुंबिक सदस्यासह दहा ते पंधरा राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. हेलिकॉप्टरने आगमन वगळता संपूर्ण कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला. असे मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांनी सांगितले. (Helicopter entry for the wedding of the NCP leader's son)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT