सालवडगाव तलाव तुडुंब
सालवडगाव तलाव तुडुंब 
महाराष्ट्र

शेवगाव तालुक्यात दमदार पाऊस, सालवडगाव तलाव तुडुंब

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन सातपुते

शेवगाव : शहरासह तालुक्यात एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर रात्री दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात रस्त्यांवर तर ग्रामीण भागात शेतांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. या पावसामुळे शेतकरीवर्गात समाधान निर्माण झाले होते. या पावसामुळे सुकलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून, दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.

तालुक्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पूर्व भागात भागात दमदार पाऊस झाला होता, तर तालुक्याच्या अन्य भागात कमी-अधिक पाऊस झाला होता. याच पावसात शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मूग व इतर पिकांची पेरणी केली होती. पिकांची उगवणक्षमता चांगली असली, तरी पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. तालुक्यात काल गुरुवारी दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. (Heavy rainfall in Shevgaon taluka)

सायंकाळी सहा वाजता दमदार पावसास सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत तालुक्यात ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. या पावसाने शहरातील क्रांती चौकातील नगर रस्त्यावर, पैठण रस्त्यावरील नित्यसेवा कॉर्नर, नेवासे रस्ता, आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक, कृषी उत्पन्न बाजार समितीमागील बाजूच्या भारदे विद्यालयाशेजारी पाणी साचले होते. (Heavy rainfall in Shevgaon taluka)

तालुक्यातील आखेगाव, सालवडगाव, थाटेवडगाव, ठाकूर निमगाव, चापडगाव, एरंडगाव, घोटण, खानापूर, कऱ्हे टाकळी, दहिफळ या भागात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी जमिनीत व ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सालवडगाव येथील तलावही दुसऱ्याच पावसात पूर्ण क्षम

तेने भरला. या परिसरातील भेंडी, मका व इतर पिके पाण्यात गेली. भातकुडगाव, अमरापूर, सामनगाव, वडुले, ढोरजळगाव, जोहरापूर, दहिगाव-ने या भागांतही समाधानकारक पाऊस झाला.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

SCROLL FOR NEXT