raigad, rain, rain alert, red alert by imd saam tv
महाराष्ट्र

Raigad : कुंडलिका, पाताळगंगाने ओलांडली धोक्याची पातळी; 'सावित्री'त एनडीआरएफचं बचाव प्रात्याक्षिक

जिल्ह्यातील कुंडलीका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : रायगड (raigad) जिल्ह्यातील पाली, नागोठणा, रोहा परिसरातुन वाहणाऱ्या कुंडलिका आणि खालापुरमधुन वाहणाऱ्या पाताळगंगा या नद्यांनी (river) आज (गुरुवार) सकाळपासुन धोक्याची पातळी ओलांडली आहे. खालापुर परीसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने या दोन नद्या इशार पातळी ओलांडून वाहत असुन परिसरात पुरसदृष्य (floods) परीस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाली, नागोठणे, रोहा परीसरातील नदी किनारी राहणाऱ्या जनतेस आणि गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (raigad rain updates in marathi)

सावित्री नदीत एनडीआरएफचं (NDRF) बचाव प्रात्याक्षिक

महाडमध्ये येणाऱ्या पुराच्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण आहे. आपत्कालीन परीस्थितीत बचाव आणि मदत कार्यासाठी महाड (mahad) आणि पोलादपुरमध्ये (poladpur) येथे दोन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पथकाने महाडच्या सावित्री नदी (Savitri River) पात्रात बचाव कार्यचे प्रात्याक्षिक केले.

पेणच्या मच्छीमाराचा उरणला सापडला मृतदेह

पेण तालुक्यातील लक्ष्मण चौरे हे मच्छीमारीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाले होते. या घटनेच्या दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह उरण येथे सापडला. दरम्यान अणखी एक मच्छीमार बेपत्ता असल्याचे प्रशासनाने सांगितलं. त्यांचे दौलत पवार असे नाव आहे.

रेड अलर्ट अन् प्रशासन सज्ज

हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला असला तरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कमी असल्याचं दिसून येत आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने रायगडला रेड अलर्ट दिल्याने प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT