Rain Forecast for Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Forecast : उद्या राज्यात पाऊस कसा असेल? कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Rain Alert in Maharashtra : उद्या राज्यात कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून धो-धो कोसळणारा पाऊस काही विश्रांती घेणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. पावसाची तीव्रता (Heavy Rain)  कमी होणार आहे.

राज्यात पुढील २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पाऊस सुरू राहील आणि त्यानंतर त्यात हळूहळू घट होईल. उद्या राज्यात कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.

बाष्पीभवन झाल्याने दरडी कोसळण्याच्या घटना मात्र घडू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (Latest News)

उद्या १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट

उद्या राज्यातील १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. (Maharashtra News)

यामध्ये ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT