Maharashtra Rain Forecast: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Forecast: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पुढील ४ दिवस मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यात पुढील ४ दिवस मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या बिहारच्या उत्तर पश्‍चिमी भागात आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

हे देखील पहा-

यामुळे राज्यात पावसाकरिता पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोकणात काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान पावसाकरिता पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT