Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; नववधूसह तिघांचा मृत्यू, भीषण अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा

Jalgaon accident today : लग्नाहून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नववधूसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

नुकतेच लग्न झाल्यामुळे आनदाचे वातावरण होते. नवीन आयुष्याची स्वप्ने पाहणारी नववधूला घेऊन घराकडे परत येत होते. पण प्रवासात काळाने घाला घातला. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर टायर फुटल्याने लग्नाच्या गाडीला भीषण अपघात झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने वाघळकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वापी येथून लग्नाचा सोहळा आटोपून वऱ्हाड क्रुझरने अकोल्याच्या दिशेने जात होते. नुकतेच लग्न पार पडल्यामुळे गाडीत उत्साहाचे वातावरण होते. पण जळगावमधील वराड गावाजवळ महामार्गावर धावत्या क्रुझरचे पुढचे टायर अचानक फुटले. टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की क्रुझरचा पुढचा भागाचा चुराडा झाला.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसे आणि लग्नाचे कपडे घातलेल्या वऱ्हाड्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यात एका लहान बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. ज्या घरात नववधूच्या स्वागताची तयारी सुरू होती, तिथे आता तिच्या मृत्यूची बातमी धडकल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सहा जण गंभीर जखमी :

या अपघातात गाडीतील अन्य ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वी ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय बालक अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Water Supply: ठाण्यात पाणीकपातीचं संकट! 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका बसणार? पाहा यादी...

Maharashtra News Live Update: - नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंप वर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक

falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

Surya Namaskar For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी किती वेळा सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो?

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

SCROLL FOR NEXT