Sangli Couple Dies Within Days Saam Tv News
महाराष्ट्र

बायकोच्या मृत्यूनंतर विरह सहन झाला नाही, रक्षा विसर्जनादिवशी नवऱ्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू; सांगलीत हळहळ

Sangli Couple Dies Within Days: सांगलीच्या आळसंद गावात अल्प आजाराने सुनीता थोरात यांचं निधन. पत्नीच्या मृत्यूनंतर धनाजी थोरात यांची प्रकृती खालावली. पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी पती धनाजी यांना हार्ट अटॅक.

Bhagyashree Kamble

  • सांगलीच्या आळसंद गावात अल्प आजाराने सुनीता थोरात यांचं निधन.

  • पत्नीच्या मृत्यूनंतर धनाजी थोरात यांची प्रकृती खालावली.

  • पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी पती धनाजी यांना हार्ट अटॅक.

  • अवघ्या दोन-तीन दिवसांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही दु:खद अंत.

सांगलीतून एक ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या आत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वात आधी पत्नीचा अल्पशा आजाराने निधन झाले. नंतर पत्नीचा विरह सहन न झाल्यामुळे पतीचाही हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सुनीता थोरात असे मृत महिलेचं नाव आहे. त्यांचा अल्पशा आजाराने निधन झाले होते. बायकोचा मृत्यू झाल्यानंतर धनाजी थोरात यांची तब्येत खालावली. दोघेही सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या आळसंद गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. धनाजी यांना बायकोचा विरह सहन झाला नाही.

धनाजी यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार घेत असतानाच त्यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृ्त्यू झाला. दरम्यान, सहा ऑगस्ट रोजी सुनीता थोरात यांचा रक्षाविसर्जन पार पडणार होते. नेमके त्याच दिवशी धनाजी यांनी प्राण सोडले.

पत्नीच्या अकाली जाण्याचा धक्का पती थोरात यांना सहन झाला नाही. धनाजी यांना विरह सहन झाला नाही. यामुळे त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसाच्या अंतरात पती-पत्नीच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT