Assembly Speaker  
महाराष्ट्र

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी; काय आहे प्रकरण?

Assembly Speaker : एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३९ आमदारांना कोर्टाने नोटीस पाठवली होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात ऐकण्यात याव, अशी शिंदे यांची मागणी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Assembly Speaker Rahul Narvekar :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ५ एप्रिलला सुनावणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३९ आमदारांना कोर्टाने नोटीस पाठवली होती. या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात यावं, अशी शिंदे यांची मागणी आहे. त्यावर देखील कोर्ट काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest News)

राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला होता. या निकालानुसार ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले. तसेच विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला. त्यानंतर ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटालाही नार्वेकर यांचा एक निर्णय मान्य नाहीये. शिंदे गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवल्यानंतर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपाबरोबर राज्यात सत्ता स्थापन केली.

यानंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली.परंतु, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घटनेतील नियमानुसार विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. विधानसभा अध्यक्षांकडे आल्यानंतर त्यांनी शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं. त्याचबरोबर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

Pakistani Celebrities Banned in India: भारताने 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर २४ तासांत पुन्हा घातली बंदी

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT