Tanaji sawant saam Tv
महाराष्ट्र

Tanaji sawant : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत म्हणून तुम्ही...; आरोग्यमंत्री सावंतांची उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका

Tanaji sawant : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवत कांँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली असं सावंत म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tanaji sawant Vs Uddhav Thackeray :

धाराशिव दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी खेडा असा उल्लेख करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुखांच्या टीकेला आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना सावंत यांनी त्यांना मूर्खमंत्री म्हटलं. यामुळे सावंतविरुद्ध ठाकरे यांच्या शाब्दिक सामना रंगला. (Latest News)

बाळासाहेबांचे जे व्रत होत जे व्रत घेतलं होतं हिंदुत्वाच होतं. ज्या वेळेस मला काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या या शिवसेनेच्या दुकानाच शर्टर कायमच बंद करेल, या सगळ्या गोष्टींवर तुळशीपत्र ठेवलं. आज त्यांच्या स्वाभिमानाचा चुराडा करून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत म्हणून तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला मांडीवर घेवून बसलात आणि तुम्ही म्हणता माझ्या बापाचा पक्ष चोरला. तुम्ही तुमच्या वडिलांचे विचार सोडून दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्ही तुमच्या वडिलांचा सगळा हेतू पायदळी तुडवला. तुम्हाला सत्तेसाठी, तुमच्या लेकराच्या एकट्या रोजगारासाठी तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात,अशी घणाघाती टीका आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मिरगव्हाण येथे बोलताना केली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर

ओमराजे यांच्या खासदारकीच्या तिकिटासाठी उद्धव ठाकरे यांना १० कोटींचा निधी चेकने दिला होता. ओमराजे यांच्यावर कोटी रुपयांचा खर्च केला. त्यांना निवडुन आणलं. तुम्हाला बापाची माया दिली पण तुम्ही लगेच बाप बदलला असल्याची खरमरीत टीका तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकरावर केली. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सावंत यांच्यावर टीका केली होती, त्याला उत्तर डॉ. तानाजी सावंत यांनी दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT