tanaji sawant Saam tv
महाराष्ट्र

मी तुम्हांला अंगठे बहादुर मंत्री वाटलाे का ? सीएम, डीसीएमचं मला मार्गदर्शन लाभलं (पाहा व्हिडिओ)

इथून पुढ मी बोललो तेच दाखवणार नसाल तर माध्यमांनी माझ्यासमोर येऊ नये असे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं.

विश्वभूषण लिमये

Tanaji Sawant News : मी तुम्हांला अंगठे बहाद्दूर मंत्री वाटतो का ? अपु-या माहितीच्या आधारे बातम्या चालवल्या जात आहेत. खरं तर हे सरकार आलेलं तुम्हांला रुचत नाहीये असा माध्यमांवर नाराजी सूर आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांचा हाेता. ते साेलापूर (solapur) जिल्हा दाै-यावर असताना हाफकीनच्या प्रश्नावरुन माध्यमांशी बाेलत हाेते.

पुण्यातील ससून रुग्ण्यालयात 'हाफकीन' या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा असं म्हणत विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या अपुऱ्या ज्ञानाच प्रदर्शन केलं होत. मात्र, यावर त्यांना सोलापुरात प्रश्न विचारला असता माध्यमांवर आरोग्यमंत्री भडकल्याच चित्र पाहायला मिळालं.

मंत्री सावंत म्हणाले माध्यमांना हे सरकार आलेलं रुचत नाहीये. मी इंजिनियर आहे आणि डिप्लोमा, डिग्री, पिजी, पीएचडी मिरीटमध्ये केलंय. 'हाफकीन' या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा असं मी बोललोच नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्र्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यामध्ये 'हाफकिन' या औषध कंपनीच डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे आणि यामध्ये नवीन औषधीय संस्था येणं गरजेचं आहे असे सावंत यांनी स्पष्ट केले.

एकदा नेट वरती जाऊन बघा मी किती शिक्षण संस्था आणि साखर कारखाने चालवतो, माझ्याकडे स्टाफ किती आहे, किती क्वालिटीचा आहे असे खडेबाेल मंत्री सावंत यांनी चुकीच्या बातम्या देणा-या माध्यमांना फटकारले. ते म्हणाले जवळपास ३०० पीएचडी होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. मी तुम्हाला अंगठेबहाद्दूर मंत्री वाटतो का ? असा सवाल देखील मंत्री सावंत यांनी विचारला.

दरम्यान, तिवारे धरण फुटीचा खेकड्याशी थेट संबंध लावत त्यावेळी सोलापुरातून चुकीची बातमी लावण्यात आली. त्यामुळं इथून पुढ मी बोललो तेच दाखवणार नसाल तर माध्यमांनी माझ्यासमोर येऊ नये. त्याचबरोबर 'हाफकीन' माणसाकडून औषध घेऊ नका असं मी बोललो असेन तर मी आत्ता राजीनामा देतो"अशा भावना व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT