कोरोनाचे नियम पाळण्याची गरज Saam Tv
महाराष्ट्र

भीती नको, कोरोनाचे नियम पाळण्याची गरज, लोकांनी गर्दी करु नये, आरोग्य मंत्र्यांचं आवाहन

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : हॉल, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी हॉलच्या क्षमतेपेक्षा 25 टक्के इतके असावे. रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. या दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांनी ऐकत्र येऊ नये. हॉटेलमध्ये केवळ 50 टक्के लोकांनी असावं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन टोपे यांनी केलं आहे. युरोपमध्ये संसर्ग अधिक वेगाने पसरत असला तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, कोरोना नियम पाळले पाहिजे, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालना येथे बोलत होते. - (Health Minister Rajesh Tope Appeal To Follow The Corona Restrictions)

शाळा सध्या सुरुच राहतील, अशी माहितीही राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. हॉटेल मधे मर्यादा घालून दिलेल्या आकड्यांपेक्षा जास्त गर्दी होऊ नये असंही टोपे म्हणाले. राज्यात जवळपास 100 ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. राज्यात पहिला डोस 87 टक्के लोकांनी घेतला असून दुसरा डोस 57 टक्के लोकांनी घेतला आहे. लोकांनी लसीकरणात सहभाग घेतला पाहिजे तरच लसीकरण पूर्ण होईल, असंही टोपे म्हणाले. ओमिक्रॉनमध्ये ऑक्सिजनची जास्त गरज पडणार नाही. ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध लागू केल्याचं देखील टोपे म्हणाले.

हेही वाचा -

केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचं असून याबाबत आता निर्णय घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. 12 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून याबाबत निर्णय व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले.

पेपरफुटीचा पोलीस योग्य पद्धतीने तपास करताहेत, सीबीआय चौकशीची गरज नाही - टोपे

आरोग्य भरतीतील परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुनर्परीक्षेबाबत पोलीस तपास अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही, असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT