आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा गोंधळात; हॉल तिकीटच्या सेंटरवरुन गोंधळ! SaamTvNews
महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा गोंधळात; हॉल तिकीटच्या सेंटरवरुन गोंधळ!

24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना मिळायला सुरवात झाली आहे. मात्र, हॉल तिकीटच्या सेंटरवरुन पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- रश्मी पुराणिक

मुंबई : 24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना मिळायला सुरवात झाली आहे. मात्र, हॉल तिकीटच्या सेंटरवरुन पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षेसाठी दोन वेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने काही विद्यार्थी संभ्रमात आहेत. मागील महिण्यात होणारी आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी परीक्षेचे नियोजन होऊ न शकल्याने पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेची तारीख 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती.

हे देखील पहा :

24 ऑक्‍टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना प्राप्त होत आहेत. यातील काही हॉल तिकीट मध्ये ज्या उमेदवारांनी दोन वेगळ्या पदांच्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्या उमेदवारांचे परीक्षेचे दोन पेपर एकाच दिवशी असून दोन्ही परीक्षांची केंद्रे मात्र दोन वेगळ्या जिल्ह्यात आहेत. शिवाय सकाळी असणाऱ्या एका परीक्षेचा पेपर सकाळी 10 ते दुपारी 12 तर, दुपारच्या सेशनचा दुसऱ्या पदासाठीचा पेपर दुपारी 3 ते 5 या दरम्यान आहे. त्यामध्ये उमेदवारांनी दोन पेपर देण्यासाठी मधल्या दोन ते तीन तासात दोन जिल्ह्यांमध्ये दीडशे दोनशे किलोमीटर अंतर पार करणे शक्य नसल्याने हे पेपर एकाच दिवशी कसे द्यायचे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे ?

तर, काही उमेदवारांनी अर्ज भरताना पर्याय म्हणून जवळचे जिल्ह्यातील केंद्र मिळावे असे नमूद केले असताना सुद्धा दूरच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर यातील अडचण दूर करून उमेदवारांना एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी पर्यायी केंद्र म्हणून अर्ज भरताना निवडले गेले होते, अशा ठिकाणी केंद्र द्यावे अशी मागणी उमेदवारांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT