Harshwardhan Sapkal Saam tv
महाराष्ट्र

Black & White : एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना तात्काळ अटक करा, ५०० कोटींच्या ऑडिओ बॉम्बवर काँग्रेस आक्रमक

Black & White Manoj Jarange Audio Clip : मनोज जरांगे यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका मांडली. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना अटक करून प्रकरणाची चौकशी करण्याचे आव्हान त्यांनी दिले.

Namdeo Kumbhar

Harshwardhan Sapkal demands arrest of Eknath Shinde and Shrikant Shinde : मनोज जरांगे यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहे. महायुतीमधील भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन पक्षांमध्येच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करावी. ऑडिओ क्लिकपची चौकशी करण्यात यावी, महाराष्ट्राला सत्य समजायला हवं, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ते ब्लॅक अँड व्हाईट या साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

अमेरिकेच्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आणि एपस्टीन फाईल्स प्रकरणावरून त्यांनी केंद्र सरकार व मंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

५०० कोटींच्या प्रकरणावर कठोर भूमिका आणि कारवाईची मागणी

५०० कोटींचा मुद्दा वगळता आम्ही मैदानावर आणि संघर्षात आहोत. सध्या तालुका पातळीवर आमचं आंदोलन सुरु आहेत. ५०० कोटी कोणी दिले, कुठून आले याची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. माझं नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना खूल चॅलेंज आहे की, आरोप झालाय आणि ऑडिओचा पुरावा आलेला आहे. आपण तात्काळ एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांना अटक करावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेसची आक्रमक भूमिका आणि देशव्यापी आंदोलने

काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्येही त्याचा एक मोठा वाटा आहे. देशभारमध्ये जी चळवळ उभी राहते त्या चळवळीत महाराष्ट्रातून खूप मोठं पाठबळ मिळत आहे. इंटेलिजन्स विभागही सतत सांगतोय, महाराष्ट्रात खूप जास्त आक्रमक्यता ही आंदोलनामध्ये दिसते, असे सपकाळ म्हणाले.

धनगर आरक्षण आणि ५०% आरक्षणाची मर्यादा

सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे आधिचे जे भाषणं असायची की, माझ्या पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये पहिला मुद्दा धनगर आरक्षणाचा असेल. पण 12 वर्ष होऊन गेले आहेत. आता त्यांना 'क्या हुआ तेरा वादा' हा प्रश्न धनगर समाज विचारतोय. मराठ्यांच्या आरक्षणाच्या अनुषंगाने काँग्रेसची भूमिका सकारात्मक आहे. मुद्दा हा आहे की, 50 टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती आता आपल्याला वाढवावी लागेल.

सतेज पाटील यांचे नेतृत्व आणि कोल्हापूरमधील राजकारण

सतेज पाटलांचं नेतृत्व आणि सुसंस्कृत वागणं याची महाराष्ट्राला गरज आहे. ते ज्या कोल्हापूरमध्ये आहेत तिथे त्यांनी संस्कृती जपण्याचं काम केलं. मात्र या निवडणुकीत आमच्या नेत्यालाच कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला आणि सगळे विरुद्ध सतेज पाटील असे एक चित्र निर्माण झालं होतं. पण निवडणुकीतून जनतेने याला उत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात रस्त्यावर फटाके फोडल्यास होणार कारवाई; पोलिसांची नियमावली जाहीर

Skin Care: इंस्टंट ग्लो आणि मुलायम त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा हा घरगुती टोनर; चेहरा दिसेल चमकदार

FACT CHECK: केंद्र सरकारची महिलांसाठी वर्क फ्रॉम योजना, महिन्याला मिळणार 25000 रुपये, नेमकं सत्य काय?

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् महायुतीला तडा; भाजप-शिंदेसेनेचं बिनसलं; नेमकं कोण खेळतंय 'गेम'?

हा तर शहा-काट 'शाहाचं' खेळ!" ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा थेट निशाणा

SCROLL FOR NEXT