Jalgaon Saam Tv News
महाराष्ट्र

Raksha Khadse: सुरक्षारक्षक असतानाही भाजप नेत्याच्या मुलीसोबत छेडछाड, मुक्ताई मंदिरात नेमकं काय घडलं?

Raksha Khadse daughter harassment: पुण्यातील स्वारगेट येथील तरूणीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा तापलेला असताना भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडलाय. त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट येथील तरूणीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा तापलेला असतानाच भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडलाय. भरयात्रेत काही टवाळखोरांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढली. सुरक्षारक्षक असूनही टवाळखोरांनी मुलींची छेड काढली.

या प्रकरणी आरोपींविरोधात पोक्सोअंतर्गत गु्न्हा दाखल केला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण त्या दिवशी नेमकं घडलं काय? हे प्रकरण कधी आणि कुठे घडलं?

नेमकं घडलं काय?

जळगावातील मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे. ही यात्रा खूप मोठी असते. या यात्रा महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत केली होती. रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत आकाशपाळण्यामध्ये गेली. मात्र, अचानक काही टवाळखोर आले. त्यांनी मुलींची छेड काढली.

सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. मुलींना धक्काबुक्की केली. नंतर पसार झाले. सुरक्षारक्षकानं तातडीनं पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. याची माहिती रक्षा खडसे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. काही तासात आरोपींना अटक झालीच पाहिजे, अशा सूचना त्यांना दिल्या.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. खडसे यांनी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जळगावाचं वातावरण तापलंय. मंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, जुने वाद मिटतील; ५ राशींच्या लोकांच्या कर्माचा हिशोब होणार

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला मागून धडकली कार; एकाचा जागीच मृत्‍यू

Rupali Chakankar: मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या, ईडीने समन्स बजावला

Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळी

Pune News: पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या, खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT