hambirrao salunkhe, islampur saam tv
महाराष्ट्र

Crime News : पेठकर कॉलनीतील वृध्दाचा खून; पाेलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहे.

विजय पाटील

Sangli Crime News I सांगलीच्या इस्लामपूर- नवीन बहेनाका परिसरातील पेठकर कॉलनीत हंबीरराव शंकर साळुंखे-खोत या ८० वर्षीय वृद्धाचा लोखंडी हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हंबीरराव साळुंखे यांना ठार मारून त्यांच्या गळयाला सुती दोरी बांधून गळफास घेतल्याचा बनाव अज्ञात मारेकर्‍यांनी केला होता. (sangli latest marathi news)

हंबीरराव साळुंखे (hambirrao salunkhe) हे पत्नीसह इस्लामपूरात (islampur) वास्तव्यास आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी हंबीरराव यांची पत्नी मंगल या मुलीच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी मुंबईला (mumbai) गेल्या होत्या. त्यामुळे चार दिवसांपासून हंबीरराव साळुंखे हे एकटेच बंगल्यात होते. सकाळी पत्नी मंगल यांनी हंबीरराव यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा फोन उचलला जात नसल्याने त्यांनी हंबीरराव यांच्या भावजयीला, शेजारच्या महिलेने (women) फोन केला. त्या घटनास्थळी आल्या. त्यानंतर दोघींनी मिळून दरवाजाची कडी उघडली. आतील बाजूस असणार्‍या छोटया बेडरूममध्ये गळयाला दोरी अडकवलेल्या अवस्थेत हंबीरराव जमिनीवर रक्ताच्या थारोळयात पालथे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेची माहिती पोलिसांना (police) व नातेवाईकांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर आत्महत्येचा प्रकार नसून तो खूनच असल्याचे स्पष्ट झाले. खुन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT