गारपिटीचा बळीराजाला फटका एका दिवसात हजारो हेक्टर पिकांच नुकसान माधव सावरगावे
महाराष्ट्र

गारपिटीचा बळीराजाला फटका; एका दिवसात हजारो हेक्टर पिकांच नुकसान

खरिपातील अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी कसाबसा सावरत असताना आता पुन्हा अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांच नुकसान केलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मराठवाड्यातील 1 हजार 941 हेक्टरवरील रबी आणि फळपिकांना फटका बसला आहे. खरिपातील अतिवृष्टीमुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी कसाबसा सावरत असताना आता पुन्हा अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांच नुकसान केलं आहे. एकाच दिवसात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे जालना जिल्ह्यात (Jalna District) झाले आहे. अंबड आणि जाफराबाद तालुक्यात 1 हजार 542.6 हेक्टरातील पीक गारपीटमुळे बाधित झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यात 399 हेक्टर क्षेत्रातील पिकाला फटका बसला आहे. याशिवाय विभागात जालना (Jalna) आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत दोन मोठी जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात नैसर्गिक आपत्तीचे संकट सुरूच आहे. अडीच महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे हातून गेले होते.

हे देखील पहा -

आता अवकाळी पावसासह गारपीटमुळे रब्बी पीक अडचणीत आले आहे. मंगळवारी मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) जालना जिल्ह्यांत झालेल्या गारपिटीत तब्बल 1 हजार 941 हेक्टरातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Maharashtra News Live Update: 'भाजपमुक्त राम'च्या नाऱ्यावर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

आता WhatsApp मुळे बर्थडे डेट सहज लक्षात राहणार; असे वापरा WhatsAppचे नवे फिचर

Blood Pressure Control: औषधांशिवाय वाढलेला बीपी नियंत्रणात आणायचाय? या 7 टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT