Influenza In Maharashtra
Influenza In Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Breaking News : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला बळी; अहमदनगरमधील संशयित रुग्णाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Influenza In Maharashtra : देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. अहमदनगरजवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका मोठया रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.  (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील हा पहिला बळी असुन देशातील तिसरा मृत्यू आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत्यू युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि नगरच्या आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली.

दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता. नगरमधील मोठया रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करत्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती.

मयत तरुण मुळचा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. कोविड आणि इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाल्याने नगरच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. इन्फ्लूएंझा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दरम्यान मयत तरूणासोबत आणि संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हरियाणा आणि कर्नाटक राज्यात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रात एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा पहिला व देशातील तिसरा बळी या विषाणूने घेतला. कोरोना लाटेतही राज्यात नगर हॉटस्पॉट ठरले होते. आता एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या नव्या विषाणूचा राज्यातील पहिला बळी नगरला गेल्याने नगरकरांना सर्तकता राहण्याची आवश्यकता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नगरमधील पहिल्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेज परिसरात मास्क सक्ती केल्याचे समजते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: चिंताजनक! मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र; १२ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

Sushma Andhare Helicopter Crash | सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे सुखरूप

Eknath Khadse: सुनबाईसाठी एकनाथ खडसे मैदानात; 'भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं केली प्रचाराला सुरूवात!

Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

SCROLL FOR NEXT