धुळ्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त ! भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त !

सोनगीर पोलिसांची गुटखा तस्करांविरोधात धडक कारवाई; एकोणवीस लाखांपेक्षा जास्तीच्या मुद्देमालासह दोघांच्या आवळल्या मुसक्या.

भूषण अहिरे

धुळे : सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जाणार असल्याची माहिती गुप्त माहितीदारामार्फत सोनगीर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश पाटील यांना माहिती मिळाली होती. हा गुटखा पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले होते.

हे देखील पहा -

या पथकामार्फत मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचण्यात आला. त्यानुसार सापळ्यादरम्यान तैनात असलेल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती मिळालेल्या क्रमांकाचा ट्रक समोरून येताना आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या ट्रकला थांबून त्यामध्ये बसलेल्या ट्रक चालक व वाहकाची विचारपूस केली.

परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हा ट्रक पोलीस ठाण्यात आणला व त्यानंतर या ट्रक ची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान आईसर ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी गुटखा व पानमसाला पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी या गुन्हयात दोघांच्या मुसक्या आवळल्या असून तब्बल 19 लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

SCROLL FOR NEXT