Dilip Walse Patil Saam Tv
महाराष्ट्र

Dilip Walse Patil News: बुलढाण्यात मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या वाहनाचा ताफा अडवला; काय आहे कारण

Dilip Walse Patil: बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटलांचा ताफा उपोषणकर्त्यांनी अडवलाय.

Bharat Jadhav

Guardian Minister Dilip Walse Patil:

बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा ताफा उपोषणकर्त्यांनी अडवलाय. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील देऊळगावमधून वळसे-पाटील यांच्या वाहनांचा ताफा जात होता. त्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी मंत्री वळसे-पाटील यांचा ताफा अडवला. ताफा आडवल्यानंतर पालकमंत्र्यांनी गाडीतून उतरुन त्यांची काय मागणी आहे, हे जाणून घेतलं. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव येथील जवळील राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. या महामार्गाचे ५०० मीटर रस्त्याचं काम रखडलेलं आहे. या रस्त्याचं काम पूर्ण करावे या मागणीसाठी येथील ग्रामस्थ उपोषण आंदोलन करत आहेत. आज रात्री पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. याची माहिती ग्रामस्थांना झाली. त्या ग्रामस्थांनी उपोषणाच्या समर्थनार्थ मंत्री वळसे-पाटील यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यानंतर मंत्री वळसे-पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली.

ज्या मार्गावरुन महामार्गाचे काम होत आहे, त्या जमिनीचा मोबादला तात्काल देऊन रखडलेला रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी उपोषण कर्त्यांनी वळसे-पाटलांकडे केली. उपोषणकर्त्यांना आश्वासित करित यावर तात्काल निर्णय घरून हा रस्ता पूर्ण करण्यात येईल, असं वळसे पाटलांनी सांगितलं. त्यानंतर पालकमंत्री तेथून निघून गेले.

वळसे-पाटील यांच्यासमोर मिटकरींचा राडा

अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच राडा झाल्याची घटना काल घडली. दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच शिवा मोहोड यांच्या नियुक्तीला अमोल मिटकरी यांनी केला विरोध केला होता. अकोल्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात हा प्रकार घडला होता. दोघांमधील वाद कायम असताना अजित पवार गटाच्या मेळाव्यात शिवा मोहोड यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT