Satara Gram Panchayat Election 2022 ओंकार कदम
महाराष्ट्र

Gram Panchayat Election 2022 : 'आधी मतदान मग लग्न'; साताऱ्याच्या नवरोबाची महाराष्ट्रात चर्चा

Satara Gram Panchayat Election 2022 : साताऱ्याच्या एका मतदाराची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. याचं कारणंही तसंच आहे.

ओंकार कदम

Gram Panchayat Elections 2022 : राज्यतील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज रविवार 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर 20 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होत आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) मतदार राजा कुणाच्या हाती कल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशात साताऱ्याच्या एका मतदाराची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. याचं कारणंही तसचं आहे. स्वतःचं लग्न असतानाही 'आधी मतदान मग लग्न' असं ठरवून नवरदेव प्रसाद सदाशिव निगडे यांनी लग्नाच्या मांडवात जायच्या आधी चक्क मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  (Latest Marathi News)

शिरवळ येथे वार्ड क्रमांक दोन साठी येथील कन्या शाळेत या नवरदेवाचे मतदान होते. दुपारी तीन वाजता स्वतःचे लग्न असताना, घरात लग्नाची लगीनघाई असतानाही वेळात वेळ काढुन आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार प्रथम बजावयचा असा मनोदय त्यांनी केला. त्याप्रमाणे लग्न मंडपात जाण्याआधी लग्नासाठीचा सर्व वेष परिधान करुन हा नवरदेव मतदानासाठी हजर झाला. (Maharashtra News)

आज सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचयतीची निवडणूक पार पडत आहे. बऱ्याच वेळा मतदारांना अनेक अमिष दाखवून मतदानासाठी आणावं लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु मतदान ही आपली जबाबदारी आहे असे समजून या नवरदेवाने समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत नेमकं चाललंय काय? रुग्णालयात ३ महिन्यांच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

8th Pay Commission: ना पगार, ना भत्ता; आठव्या वेतन आयोगाचा या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

देशातील टॉप १० श्रीमंत शहरे! मुंबई पहिल्या क्रमांकावर, तर पुण्याने पटकावला 'हा' क्रमांक, वाचा यादी

Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT