Pandharpur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Accident : भरधाव कार थेट दुकानात घुसली; आजीसह ५ वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

भरधाव वेगात येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुटुंबाला जोरदार धडक दिली. या धडकेत आजीसह नातवाचा दुर्देवी मृत्यू झाला.

भरत नागणे

Pandharpur Accident News : पंढरपुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुटुंबाला जोरदार धडक दिली. या धडकेत आजीसह नातवाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

द्रौपदा शिवाजी आटपाडकर आणि सिद्धेश्वर काळेल, अशी मृत्युमुखी पडलेल्या आजी-नातवाचं नाव आहे. या धडकेत मुलाचे वडील नामदेव काळेल आणि त्याची आई रुक्मिणी काळेल देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोला येथील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेल कुटुंब रोजगारासाठी मुंबई येथे जाणार होते. ते पंढरपूर-आटपाडी (Pandharpur) रोडवरील शेरेवाडीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलसची वाट पाहत उभे होते. यावेळी समोरून एक भरधाव कार आली. काही कळण्याच्या आतच या कारने काळेल कुटुंबीयांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण (Accident) होती, की भरधाव कार थेट दुकानात घुसली. त्यामुळे दुकानाची भिंत कोसळली. या भीषण अपघातात यावेळी द्रौपदा शिवाजी आटपाडकर यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर नातू सिद्धेश्वर काळेल याच्या अंगावर दुकानाची भिंत पडल्याने तोही मृत्युमुखी पडला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अपघातग्रस्त कार ही एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचं बोललं जातंय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT