Grampanchayat Election Result 2022, saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result 2022 : मुख्यमंत्री शिंदे गटाची एक मतानं बाजी; 'मविआ' ची फेर मतदानाची मागणी

दापोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यातील अस्तान ही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Grampanchayat Election Result 2022 : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे एकेक निकाल जाहीर हाेऊ लागले आहेत. निकाल समजताच उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लाेष करीत आहेत. रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांच्या गटातील उमेदवार एका मताने विजय झाला आहे. त्यानंतर विराेधी गटानं निवडणुक विभागाला पत्र देत निकालावर आक्षेप नाेंदविला आहे. ईव्हीएम मशीनवर मतदानाची तारीख चुकीची दाखवत असल्याचे अर्जात म्हटलं आहे. (Maharashtra News)

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. खेड तालुक्यातील अस्तान या अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एका मताने शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर भाजपच्या आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला. (Ratnagiri Latest Marathi News)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची तारीख 16 असताना 15 तारखेला मतदान झाल्याची तारीख मशीन वरती का दाखवत आहे असा आक्षेप ताेंडी व लेखी घेऊन पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यातील अस्तान ही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे.

या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली आहे. अवघ्या एकमताने शिंदे गट उमेदवार निवडून आला आहे. मात्र ईव्हीएम मशीनवर मतदानाचा दिनांक 16 ऐवजी 15 दाखवत असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आता मागणी केली आहे. या अर्जावर काय निकाल जाताे याची उत्सुकता ग्रामस्थांनी लागली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Maharashtra Politics : "आम्हाला वेगळा न्याय का? राणा दांपत्याची भाजपमधून हकालपट्टी करा"

PM Modi In Mumbai: पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेसाठी खारघरमधील वाहतुक मार्गांमध्ये मोठे बदल, 'या' ठिकाणी नो पार्किंग झोन

Government Job: चौथी आणि दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कोचिन शिपयार्डमध्ये जॉब; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: अचानक वेगाने गेंडा आला रस्त्यावर, लोकांना पळता येईना, पुढे जे घडलं ते पाहा

SCROLL FOR NEXT