grampanchayat election saam tv
महाराष्ट्र

Election News : सर्वांत माेठी बातमी; ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित

या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबरला जाहीर होणार आहे.

दीपक क्षीरसागर

Election News : लातूर जिल्ह्यातील 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमुळे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. यात लातूर जिल्ह्यातील ५५ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

राज्यात (maharashtra) ग्रामपंचायतींसह विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्याच गाजतात. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.

दोन्ही निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण तणावाचे होऊ नये, याकरिता शासनाने 'अ' आणि 'ब' स हकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ७१५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

यामध्ये निवडणुकीची (election) नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन मागवून छाननी होणार आहे. नामनिर्देशन मागे घेणे, मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची (grampanchayat) निवडणुकीचा निकाल २० डिसेंबरला जाहीर होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT