Ahmednagar Grampanchayat Election 2023  Saam TV
महाराष्ट्र

Grampanchayat Election 2023 : अहमदनगरमध्ये मतदान कक्षाबाहेर मतदाराचा हृदयविकाराने झटक्याने मृत्यू

Ahmednagar Grampanchayat Election 2023 : सुनील गांधी असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News :

राज्यभरातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchayat) आज मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी अहमदनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या करंजीत मतदानानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराने धक्क्याने मृत्यू झाला आहे.

सुनील गांधी असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. मतदान कक्षाच्या बाहेर आल्यानंतर सुनील गांधी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

गांधी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. सुनील गांधी काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. (Tajya Batmya)

अहमदनगरमध्ये मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होतं. या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यां बरोबरच विधानसभा आणि लोकसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या ग्रामपंचायतचे निकाल जाहीर होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील प्रामुख्याने लढती या जामखेड कर्जत मतदारसंघातील भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये होत आहे. दोन्हीही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही आता वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Border-Gavaskar Trophy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीमची घोषणा; पर्थ टेस्टमध्ये 'हा' ओपनर करणार डेब्यू

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Nashik Crime : अनैतिक संबंधाला अडथळा, मावसभावाने काढला भावाचा काटा, नाशिक हादरले!

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कुणाची चलती?

Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT