dapoli, ramdas kadam, eknath shinde, uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Dapoli त खेड तालुक्यातील गावांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, रामदास कदमांच्या नेतृत्वाखाली हाती घेतले धनुष्य

काेकणात गेल्या काही दिवसांपासून राजकारणाला वेग आला आहे.

Siddharth Latkar

- जितेश काेळी

Ramdas Kadam News : कोकणातील (kokan) दापोली (dapoli) विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा ठाकरे (uddhav thackeray faction) गटाला खिंडार पाडण्यात शिंदे गटाच्या (cm eknath shinde faction) शिवसेनेला यश आले आहे. खेड (khed) तालुक्यातील खोपी गावातील जांभिलवाडी, अवकिरेवाडी व मिर्ले गावातील मानेवाडी येथील ग्रामस्थांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. (Maharashtra News)

शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत कुंभाडं गावात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे व संघटक महेंद्र भोसले यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला. सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षात स्वागत करून आपल्या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम हे देखील उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदार संघात शिंदे गटा कडून ठाकरे गटाला शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रलंबित प्रश्नांसाठी प्राध्यापकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

Vangyache Kaap Recipe: वांग्याची भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत काप

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई, सरकारचा मोठा निर्णय

Bigg Boss 19: बिग बॉस फेम गौरव खन्नाच्या बायकोचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

Bhakri Tips: बाजरीची भाकरी तव्याला चिटकतेय? या टिप्सने भाकरी बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT