Gram Panchayat Elections  Saam Tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Gram Panchayat Elections Date: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पण एसआयआर प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

Priya More
  • महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट

  • SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात येणार

  • ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार

  • ग्रामपंचायत निवडणुका जानेवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता

ग्रामपंचायत निवडणुकांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. SIRच्या प्रक्रियेमुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत निवडणुका आता नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असून गावगावच्या नवीन कारभाऱ्यांसाठी आता जानेवारी २०२७ ची वाट पाहावी लागू शकते. मात्र विकास कामामध्ये अडथळा येऊ नये यासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

मतदार यादीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यक्रमावर परिणाम होणार का? ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुदत संपलेल्या आणि निवडणुका प्रलंबित असलेल्या काही ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. एसआयआर अंतर्गत सर्व हरकती आणि सुनवण्या पूर्ण होऊन ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यकारणी नसल्यामुळे गावपातळीवर विकासकामं आणि महत्वाचे प्रकल्प संथ गतीने सुरू आहेत. निवडणुका पार पडेपर्यंत किंवा पुढील ६ महिन्यांपर्यंत गावाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वजण वाट पाहत आहेत. गावातील काम रखडल्यामुळे निवडणुकी लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT