grampanchayat election result , satara , khed , mla mahesh shinde, mlc shashikant shinde  saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला माेठा धक्का; शिंदे गटाची आगेकूच

आज एकेका ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर हाेत असून विजयी उमेदवारांचे सर्मथक जल्लाेष करीत आहेत.

ओंकार कदम

Grampanchayat Election Result : सातारा शहरानजीकच्या खेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार महेश शिंदे (mahesh shinde) यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटास तीन जागांवर विजय मिळवून धक्का दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील खेड, खिंडवाडी, गोजेगाव, चिंचनेर संमत निंब, उफळी, संभाजीनगर या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतमोजणी झाली. आज येथील तहसिल कार्यालयाच्या परिसरात सकाळी दहापासून मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.

पहिल्या टप्प्यात खेड ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचे समर्थक आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये वनवासवाडी वॉर्डमध्ये आमदार महेश शिंदे गटाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापाठाेपाठ कृष्णानगर वॉर्डमध्ये आमदार महेश शिंदे गटाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तसेच खेड गावठाण वॉर्डमध्ये आमदार महेश शिंदे गटाचे दाेन उमेदवार विजयी झाले आहेत.

आत्ता पर्यंत हाती आलेल्या निकाल हा राष्ट्रवादीच्या आमदार शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अद्याप खेड ग्रामपंचायतीच्या तीन वार्डातील निकाल येणे बाकी आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT