gram panchayat election result 2022, akola , shivsena , vanchit bahujan aaghadi saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result 2022 : ...अन् उद्धव ठाकरे गटाचा सुरु झाला जल्लाेष

विजयी उमेदवारांचे सर्मथक ठिक ठिकाणी जल्लाेष करीत आहेत.

जयेश गावंडे

Gram Panchayat Election Result 2022 : रविवारी राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे (election) निकाल हाती येऊ लागले आहेत. अकोल्यातील (akola) सहा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून यामध्ये दाेन ठिकाणी शिवसेनेचा सरंपच निवडून आला आहे.

अकोल्यातील सहा ग्रामपंचायतीचा निकाल लागले असून सहा ग्रामपंचायतपैकी पाच ग्रामपंचायत या अकोट तालुक्यातील आहेत. तर एक ग्रामपंचायत ही बाळापूर तालुक्यातील आहे. या सहा पैकी दोन ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विजयी झाले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी, भाजप, प्रहार आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

अकोला ग्रामपंचायत निकाल (सहा ग्रामपंचायत निकाल पूर्ण)

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड सरपंच पदाच्या निवडणुकीत विजेंद्र तायडे विजयी. इथे वंचितचं सपूर्ण पँनल विजयी झालं आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शिवपुर -कासोद इथे सरपंच पदाच्या निवडणुकीत माया मनिष महल्ले विजयी झाले आहेत.

गुलरघाट सरपंचपदी प्रहारच्या सर्मथक प्रकाश डाखोरे हे विजयी झालेत.

धारगड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत संजय माणिक ठाकरे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

सेनेचे वर्चस्व

याबराेबरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या दाेन जणांनी सरपंच पदाची खूर्ची पटकावली आहे. यामध्ये व्याळा ग्रामपंचायतीत गजानन वझीरे यांनी तसेच धारुळ-रामापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राजु धुंदे यांनी विजय मिळविला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT