Controversy erupts after alleged fake copies of Govind Pansare’s book “Who Was Shivaji?” surface in the market. saam tv
महाराष्ट्र

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या बनावट प्रतींची विक्री बाजारात सुरु असल्याचा खळबळजनक आरोप पानसरे कुटुंबियांनी केलाय...मात्र एका नामंकित प्रकाशन संस्थेनं विक्री करण्यासाठी परवानगीविना पुस्तक कसे छापले आणि त्यामुळे प्रकाशकाला कसा माफीनामा सादर करावा लागलाय... पाहूयात या स्पेशल

Suprim Maskar

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरु झालेला राजकीय वाद एकीकडे शमत असताना पानसरेंच्या पुस्तकाच्या बनावट प्रतिंवरून नवा वाद पेटलाय.... शिवाजी कोण होता, या मूळ पुस्तकातील मजकुरात छेडछाड करून, त्याच्या बनावट प्रती बाजारात आणल्याचा गंभीर आरोप पानसरे कुटुंबीयांनी काही प्रकाशकांवर केलाय...

दरम्यान या बनावट पुस्तकात पानसरेंनी कधीच न लििहलेले उतारे असल्याचा आणि पी. बी. सावंत यांची मूळ पुस्तकातील प्रस्तावना वगळल्याचा आरोप पानसरेंच्या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केलाय... दरम्यान या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी साम टिव्हीचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी थेट मधुश्री पब्लिकेशनचे प्रकाशक शरद अष्टेकर यांच्याशी संवाद साधला... त्यावेळी नजरचुकीनं जुनीच प्रत प्रिंट केल्याचा दावा करत अष्टेकरांनी केलाय... तसचं प्रिंट केलेल्या 5 हजार प्रति नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचा दावाही त्यांनी केलाय....

मात्र पुस्तकाचे कॉपीराईट नसतानाही मधुश्री पब्लिकेशननं हे पुस्तक कसं छापलं? इंटरनेटवर मिळालेली पानसरेंच्या पुस्तकाची प्रत पब्लिकेशननं कशी काय छापली? पानसरेंच्या पुस्तकावरून आधीच महाराष्ट्रात वेळोवेळी राजकीय नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात असताना पुस्तक छापताना पानसरे कुटुंबियांची परवानगी घेण्याची आवश्यकता वाटली नाही का? मधुश्रीप्रमाणेच इतर कुठल्या प्रकाशन संस्था पानसरेंच्या पुस्तकाची बनावट प्रतींची बाजारात विक्री करतायत, याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे... मात्र इतिहासासोबत झालेली ही छेडछाड महाराष्ट्र खपवून घेणार नाही.. येवढं मात्र निश्चित.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रखडलेले काम पूर्ण होणार, कार्यालयात मोठी जबाबदारी मिळणार; ५ राशींच्या लोकांवर होणार श्री गणेशाची कृपा

माणूस आणि कावळ्याची जिवाभावाची मैत्री; ९ वर्षांचा हृदयस्पर्शी किस्सा

खासगी कार्यालयात तलाठ्यांचा दरबार, गावचं कार्यालय सोडून शहरात तलाठ्यांची दुकानदारी, 'साम इन्व्हेस्टीगेशन'मध्ये तलाठ्यांचा पर्दाफाश

DA Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ६३ टक्क्यांची वाढ होणार

कोर्टातील 'तारीख पे तारीख' बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT