Bhagat Singh Koshyari Saam Tv
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari Resign : भाजपच्या वरिष्ठांचा दबाव असल्याची राज्यपालांनी दिली होती कबुली; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

"माझ्यावर भाजपचा वरिष्ठांचा खूप दबाव, त्यामुळे मला असं वागावं लागत आहे"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabad News : माझ्यावर भाजपचा वरिष्ठांचा खूप दबाव आहे. त्यामुळे मला असं वागावं लागत हे राज्यपालांनी मला भेटल्यावर माझ्याकडे कबूल केलं होतं असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. तसेच आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपने (BJP) राज्यपाल बदलण्याचा निर्णय खूप उशिरा घेतला राज्यपाल हे घटनात्मक पद आहे त्या पदाची काय अवस्था झाली? लोकांना आंदोलने करावी लागली निषेध करावा लागला असेही खैरे म्हणाले.

आता नव्या राज्यपालांनी तरी आता कोशारींसारखे वागू नये जर भाजपने तुमच्यावर दबाव टाकला तर तुमचे नाव अशा प्रकारे खराब होऊ शकतो त्यामुळे तुम्ही दबावाला बळी पडू नका असा सल्लाही चंद्रकांत खैरे यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT