BhagatSingh Koshyari  Saam TV
महाराष्ट्र

BhagatSingh Koshyari : राज्यपालांकडून पुन्हा एकदा महापुरुषांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरींनी व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना विचारला 'तो' प्रश्न

आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी माहाराज आणि अन्य महापुरुषांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.

Ruchika Jadhav

BhagatSingh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांच एक वेगळंच समीकरण तयार झालं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महारांविषयी वादग्रस्त उल्लेख केला होता. त्या आधी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यांनी त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. अशात आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी माहाराज आणि अन्य महापुरुषांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. (Latest Bhagatsingh Koshyari News)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांचा एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. तसेच राज्यपालांच्या मनात नेमकं काय चाललंय? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील का? असा सवाल केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी तेथील व्यक्तींना संबोधित करताना त्यांनी महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला. " आज सर्वच व्यक्ती म्हणतात की, शिवाजी असले पाहिजेत, चंद्रशेखर पाहिजेत, भगतसिंह पाहिजेत, नेताजी पाहिजेत... मात्र ते स्वत:च्या घरात नाही, तर दुसऱ्याच्या घरात असले पाहिजेत.", असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

" राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? ", असा प्रश्न अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT