Manoj Jarange Vs Baraskar  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Vs Baraskar : बारसकर यांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंची सडकून टीका; काय म्हणाले होते बारसकर?

Manoj Jarange Vs Baraskar : अजय महाराज बारसकर यांनी मराठा आरक्षणावरून जरांगें पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी या आरोपांचं खंडन केलं असून सरकारकडून ट्रॅप लावण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sandeep Gawade

Manoj Jarange Vs Baraskar

अजय महाराज बारसकर यांनी मराठा आरक्षणावरून जरांगें पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी या आरोपांचं खंडन केलं असून सरकारकडून ट्रॅप लावण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने आता कितीही ट्रॅप लावले, माणसं फोडली तरी मराठा आंदोलक आता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ धडकणार आहेत.

अजय बारसकर हे सरकारचा ट्रॅप असून भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला.

मनोज जरांगे यांनी दररोज आपली वक्तव्ये बदलली आहेत.जरांगे कॅमऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत, असं समजून जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी २३ डिसेंबर रोजी पहिल्यांदा कन्हया हॉटेलमध्ये पहिली गुप्त भेट घेतली, असा धक्कादायक दावा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील महत्त्वाची व्यक्ती अजय महाराज बारसकर यांनी केला होता.

अजय महाराज बारसकर यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आज माध्यमांशी मुंबईमध्ये संवाद साधला. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणच्या आंदोलनात मराठा समाजाला कशा प्रकारे वेठीस धरून आपली स्वार्थ भूमिका मांडत आहेत यासंदर्भात पत्रकार परिषदेत आरोप केले होते. त्यानंतर लगेचच जरांगेंनी यावर पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले होते बारसकर?

25 तारखेला सगळ्यांच्या साक्षीने मुंबईला निघायचं होतं. त्यावेळी अचानक २० जानेवारीला मुंबईला निघायचं अशी घोषणा जरांगे पाटलांनी सभेवेळी केली. त्यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता ही घोषणा केली होती. जरांगेंची रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी बैठक झाली होती, असा गौप्यस्फोट अजय महाराज बारसकर यांनी केला आहे.

लोणावळा आणि वाशीमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी गुप्त बैठक घेतल्या आहेत. त्यामुळे जरांगे पाटील पारदर्शक व्यक्ती नाहीत हे समाजाने लक्षात ठेवावे. वाशी मार्केटमध्ये देखील सभा झाली होती. जरांगे गुप्त बैठका करत आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं. मात्र एक आंदोलक आणि समाजाचा एक भाग म्हणून मी त्यांच्यासोबत होतो, असंही बारसकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT