anganwadi  saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Jobs: परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; अर्ज कसा कराल?

Anganwadi Supervisor Recruitment: अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Government Jobs For Womens: अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४०,००० रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून, कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये. या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय आहेत निकष? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या.

अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होईल आणि जानेवारी २०२५ मध्ये समाप्त होईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ च्या मध्ये असणं गरजेचं आहे. या पदासाठी पगार हा १८ हजार रुपये इतका असणार आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती

पदाचे नाव - अंगणवाडी पर्यवेक्षिका

एकूण रिक्त पदे - ४०,०००

वयोमर्यादा - १८ ते ४५ वर्ष

पदवी - ( राज्यानुसार बदलेल)

अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन/ ऑफलाईन

पगार - ८,००० ते १८,०००

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५

निवड प्रक्रिया - गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)

अधिकृत संकेतस्थळ - www.wcd.nic.in ( या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

शैक्षणिक पात्रता -

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT