Gotya Gite Video Saam Tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case: 'मी आत्महत्या करेन, याला जबाबदार जितेंद्र आव्हाड'; गोट्या गीतेच्या नव्या VIDEO ने खळबळ; पाहा काय म्हणाला?

Gotya Gite Video: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गीतेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये गोट्या आत्महत्या करेन अशी धमकी देतोय. या आत्महत्येचा जितेंद्र आव्हाड जबाबदार असतील असे त्याने सांगितले.

Priya More

Summary -

  • गोट्या गीतेचा आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत त्यांना जबाबदार धरले.

  • रेल्वे रुळावर बसून चित्रीत केलेला भावनिक व्हिडिओ.

  • गोट्या गीते फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गीतेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोट्या गीतेने थेट रेल्वे रुळावर बसून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्याने या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत ते आत्महत्येला जबाबदार असतील असा इसारा दिला. गोट्या गितेचे या आधी देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. ते सर्व व्हिडिओ धमक्या आणि दहशत माजवणारे होते. तर आता त्याने थेट आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्यामुळे खळबळ उडाली.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गोट्या गीते म्हणतो की, 'वाल्मीक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे, तर बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी बबन गीतेला पोलिसांनी सरेंडर करावं. शिवाय, माझ्यावर आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी हे आरोप थांबवावे. अन्यथा मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील.', असा इशारा गोट्या गीतेने थेट या व्हिडिओमधून दिला आहे.

गोट्या गीतेने हा संपूर्ण व्हिडिओ एका रेल्वे रुळांवर बसून चित्रीत केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मोठा भावनिक स्फोट केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेला गोट्या गीते अजूनही फरार आहे. पोलिस गोट्या गीतेचा शोध घेत आहेत पण अद्याप तो पोलिसांना सापडला नाही. मात्र, आता तो त्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. गोट्या गीतेला लवकर अटक होते का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजा गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

Maharashtra News Live Update: जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी करा; गडचिरोलीत भव्य ओबीसी मोर्चा

SCROLL FOR NEXT